Pune: धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्र पवार बहुद्देशीय भवनात राजगड विकास परिषदेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या कार्याचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. शिवजयंतीचे औचित्य साधत “राजगड विकास परिषद” या अराजकीय सामाजिक संघटनेच्या स्थापनेची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ इतिहास संशोधक दत्तात्रय नलावडे, एमएसडीएचे अध्यक्ष मिलिंद पाटील, नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे, डॉ. संभाजी मांगडे, अशोक वाडकर तसेच हंड्रेड सोशल फाउंडेशनचे राजेंद्र चोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माऊली दारवटकर म्हणाले, “राजगड हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून आपल्या अस्मितेचा केंद्रबिंदू आहे. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा उभारणे आवश्यक आहे. युवकांनी या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, जेणेकरून राजगडचा विकास प्रत्यक्षात साध्य होईल.” राजगड व भोर तालुक्यातील भूमिपुत्रांचे संघटन अधिक मजबूत करून स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याचा आणि विकासकामांना गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत विकासासाठी ठोस आणि परिणामकारक काम करण्याचे आवाहन केले. ■ नवी कार्यकारिणी कार्याध्यक्ष : डॉ. संभाजी मांगडे मुख्य समन्वयक : अशोक वाडकर उपाध्यक्ष : उल्हास दारवटकर, संतोष शेंडकर, हरीश कोकाटे, अॅड. संदीप पिलाने, गणेश गोरे, प्रवीण कोंढाळकर, राजेंद्र देवकर, विजय धुमाळ मुख्य संघटक : विलास बोरगे सचिव : अॅड. नितीन दसवडकर मुख्य प्रसिद्धी प्रमुख : पांडुरंग मरगजे तालुका व शहर पातळीवरील पदाधिकारी तालुका समन्वयक (भोर) : गोरख मानकर | तालुका संघटक (भोर) : आदित्य बोरगे तालुका समन्वयक (राजगड) : अमोल पडवळ | तालुका संघटक (राजगड) : राजेंद्र खुळे शहर समन्वयक : शंकर कडू, शैलेश कोकाटे | शहर संघटक : नाना धुमाळ देशमुख महिला विभाग शहर समन्वयक : सारिका जगताप | महिला संघटक (राजगड) : प्रियांका कोडीतकर