– गेल्या काही वर्षांत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. ती सोडविण्यासाठी विकास आराखड्यातील आरक्षित पार्किंगची आरक्षणे विकसित करण्यावर भर राहणार आहे. पेठांचा भाग असल्याने रस्ते छोटे आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यावर आपला भर असणार आहे. मागील पाच वर्षांत प्रभागातील रस्ते, ड्रेनेज, पाण्याची समस्या सोडविण्यावर विशेष भर दिला आहे. – गायत्री खडके (माजी नगरसेविका, भाजप) – मी नगरसेवक म्हणून कटेंनरमुक्त आणि खड्डेमुक्त प्रभाग करण्यासाठी भर दिला. प्रभागात मोठ्या प्रमाणात जुन्या चिनी मातीच्या ड्रेनेज लाइन बदलण्यावर भर दिला. अंतर्गत रस्ते काँक्रीटचे करतानाच पावसाळी वाहिन्या टाकल्या. त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. पुढील पाच वर्षातही स्वच्छ सुंदर व विकसित कसबा करण्यावर आपला भर राहणार आहे. – राजेश येनपुरे (माजी नगरसेवक, भाजप) या प्रभागात जे नगरसेवक झाले, तेच आमदार झाले. तरीपण जुन्या वाड्यांचा प्रश्न कायम आहे. शनिवारवाडा परिसरात पुनर्वसनाला अडचणी कायम आहेत. पार्किंग, आरक्षण विकसित करणे गरजेचे आहे. त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. त्यावर आपला भर राहणार आहे. विद्यमान आमदारांनी स्थायी समितीत दिलेल्या निधीतून काहीच झालेले नाही. त्यामुळे प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा आपला मानस आहे. – गौरव बोऱ्हाडे (इच्छुक, काँग्रेस) प्रभागात आरोग्य, स्वच्छता, वाहतूक व जुन वाडे व इमारतींचा पुनर्विकास हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून भाजपचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात बाजारपेठ असल्यामुळे आरोग्य, स्वच्छता व वाहतूक व्यवस्था सुधारण्याची तातडीने गरज आहे. पुनर्विकासाचा प्रश्न तडीस नेणे गरजेचे आहे. पुनर्विकासाला चालना मिळण्यासाठी मध्य वस्तीसाठी महापालिकेकडून वेगळे नियम करण्याची गरज आहे. – कुणाल टिळक (इच्छुक उमेदवार, भाजप)