पुणे – पैशांच्या वादातून चौघांनी मिळून शस्त्राने वार करून चिकन विक्रेत्याचा खून केल्याची घटना बोपोडी भागात घडली.
रजनीकांत उर्फ मॉंटी सुंदर परदेशी (32, रा. बोपोडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी मन्सूर मौला शेख (19) याच्यासह चौघांना ताब्यात घेतले आहे. परदेशी यांचे बोपोडी भागात चिकन विक्रीचे दुकान आहे. त्यांनी एका आरोपीकडून पैसे घेतले होते. यावरून त्यांचात वाद झाले होते.
आरोपींनी परदेशी यांची दुचाकी ताब्यात घेतली होती. शनिवारी सकाळी आरोपींनी परदेशी यांना बोपोडी परिसरात बोलावून घेतले. त्यांच्यावर कोयत्याने वार करून डोक्यात फरशी घातली.