Neelam Gorhe : अवघ्या काही दिवसांवर पुणे महापालिकेची निवडणूक येवून ठेपलेली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे पक्षाच्या गोट्यात अनेक वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांना शिवसेनेकडून एबी फॅार्मचे वाटप करण्यात आले होते. मात्र, ज्यांना एबी फॅार्म देण्यात आले होते. अशा ६० हून अधिक उमेदवारांकडून एबी फॅार्म माघारी घेण्यात आल्याची माहिती समोर आले आहे. यामुळे शिवसेना पक्षात नेमकं काय सुरूऐ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे पुण्यातील बैठकीला पोहचल्या आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. पुण्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात जागावाटपावरून तिढा निर्माण झाला असून, हा तिढा सोडविण्यासठी पक्षाचे नेते उदय सामंत हे देखील पुण्यात दाखल होत आहेत. “आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो निरोप असेल त्यानुसार होईल. सर्वांना कल्पना आहेच की, वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.” अशी प्रतिक्रिया नीलमी गोऱ्हे यांनी दिली. आमच्याकडच्या काही उमेदवारांनी फॉर्मही भरले आहेत. मात्र, अजून आम्ही सगळ्यांना एबी फॉर्म दिलेले नाहीये, अशी माहिती देखील गोऱ्हेंनी दिली. पुढे त्या म्हणाल्या, पण आम्हाला जसा निरोप येईल, त्यानुसार आम्ही वेळेत लोकांचे एबी फॉर्म पोहोचवू. त्या पद्धतीने एबी फॉर्मचे वाटप करणार आहोत. तसेच नीलम गोऱ्हे यांनी पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भेट घेतली. या भेटीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याबद्दल माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. ती एक सदिच्छा भेट असावी, असे मला वाटते. शिवसेनेत नाराजीचा सूर आजचा दिवस महत्वाचा असून पुण्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत अद्यापर्यंत निर्णय झालेला नाही. शिवसेनेतील नेत्यांची भूमिका रवींद्र धंगेकर सोडून स्पष्टपणे समोर आलेली नाही. त्यामुळे जागावाटपाचा तिढा आणखी घट्ट झाला आहे. तसेच ज्या ६० जणांना शिवसेनेने एबी फॅार्मचे वाटप केले होते, त्यांच्याकडून एबी फॅार्म माघारी घेतल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले असून, शिवसेनेत प्रचंड प्रमाणात नाराजी पसरली आहे. हेही वाचा : प्रियांका गांधी यांच्या मुलाचा होणार साखरपुडा ; कोण आहे वाड्रा कुटुंबाची भावी सून कोण?, जाणून घ्या