प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीसाठी उद्या, गुरुवारी मतदान होणार असून प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील सर्व ४ हजार ११ मतदान केंद्रांवर दुपारी अधिकारी पोहचले. यावेळी अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रे मतदानासाठी सज्ज केली.प्रशासनाने १५ क्षेत्रीय कार्यालयानिहाय निवडणुकीचे साहित्य नेण्याची व्यवस्था केली होती. याठिकाणी अधिकारी-कर्मचाऱ्यांना अंतिम प्रशिक्षण देण्यात आले त्यानंतर साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट आदींचा समावेश होता. यानंतर मतदान केंद्रनिहाय कर्मचारी केंद्रावर रवाना झाले. या पथकामध्ये पोलिसांचाही समावेश होता. यावेळी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. मतदान केंद्रांवर कर्मचारी पोहचल्यानंतर त्याची माहिती त्यांनी झोनल अधिकाऱ्यांना कळविली. यानंतर अधिकारी-कर्मचारी यांनी मतदान केंद्र सज्ज केले. आवश्यक ते सूचना फलक लावले. दहा मिनिटांत नवे मशीन प्रत्येक ८ ते १० मतदान केंद्राच्या मागे एका झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यानुसार शहरात ४५४ झोनल अधिकारी नेमले आहेत. हे अधिकारी मतदान केंद्रांची पाहणी करणार आहेत. केंद्रावर काही समस्या निर्माण झाल्या तर झोनल अधिकारी निर्णय घेणार आहे. या अधिकाऱ्यांसोबत अतिरिक्त कर्मचारी आणि राखीव मतदान यंत्रे असणार आहे. एखाद्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यास अवघ्या १० ते १५ मिनिटात त्या मतदान केंद्रावर नविन मशीन उपलब्ध करून दिले जाईल. -एकूण नियुक्त आरोग्य कर्मचारी- १ हजार २०० – दिव्यांगासाठी व्हिलचेअर – ८३२ -सर्व मतदान केंद्रांवर मूलभूत सोयी – दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक, गर्भवतींना मतदानावेळी प्राधान्य एकूण प्रभाग -४१ प्रभाग ३८ मध्ये पाच उमेदवारांना तर उर्वरित प्रभागांमध्ये चार जागांसाठी मतदान करावे लागणारप्रत्येक जागेसाठी ईव्हीएम मशीनवर स्वतंत्र रंगाची मतपत्रिका. पांढरा अ, फिकट गुलाबी ब, फिकट पिवळा क, फिकट निळा रंग ड जागेसाठी असणार आहे.