Pune : शहरात वातावरणाची सरमिसळ….

पुणे : शहरात किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने रात्री हवेतील गारवा वाढला आहे. एकीकडे रात्री थंडी जाणवत असून पहाटे विरळ धुके पडत आहे. तर, दुसरीकडे दिवसभर कमाल तापमान ३७ ते ३८ अंशापर्यंत गेल्याने दिवसभर उन्हाचा चटका जाणवत असल्याने वातावरणाची सरमिसळ जाणवत आहे.
शनिवारी (दि. १५) १४ ते १५ अंशावर गेलेले किमान तापमान ११ अंशापर्यंत खाली आले. हवेली येथे ११.९ तर एनडीए परिसरात १२.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. कोरेगांव पार्क येथे सर्वाधिक ३७.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
चिंचवड येथे ३७.१, तर शिरूर, गिरीवन, लवळे, मगरपट्टा, वडगावशेरी, शिवाजीनगर, भोर, एनडीए आणि पाषाण या परिसरात ३५ अंशाच्या पुढे कमाल तापमान नोंदविले गेले. दरम्यान, पुढील दोन दिवसात शहरासह जिल्ह्यात कमाल व किमान तापमान एक ते दोन अंशाने वाढ होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमान
राजगुरूनगर ३७.७, कोरेगांव पार्क ३७.४, चिंचवड ३७.१, शिरूर १६.६, गिरीवन ३५.९, मगरपट्टा ३५.७, वडगांवशेरी ३५.६, शिवाजीनगर ३५.५, भोर ३५.३, एनडीए ३५.२, पाषाण ३५, हवेली आणि इंदापूर ३४.७, बारामती ३४.४,





