Pune Metro: बुधवार पेठ मेट्रो स्टेशनवर ब्रेक थ्रू करत १२ किमी भूमिगत मेट्रो टनेलिंगचे काम पूर्ण

Updated On:
Pune Metro: बुधवार पेठ मेट्रो स्टेशनवर ब्रेक थ्रू करत १२ किमी भूमिगत मेट्रो टनेलिंगचे काम पूर्ण

पुणे – पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट ते बुधवार पेठ या भूमिगत मार्गावर बोगदा पाडण्याचे शेवटच्या टप्प्यातील काम शनिवारी पूर्ण झाले. टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) मुळा-2 ने बुधवार पेठ मेट्रो स्थानकावर “ब्रेक थ्र’ू करण्यात मेट्रो प्रशासनाने यश मिळवले आहे.

भूमीगत मार्गासाठी स्वारगेट येथून दि. 2 सप्टेंबर 2021ला खोदकाम सुरू झाले होते. टीबीएम मुळा-2 मशीनद्वारे स्वारगेट ते बुधवार पेठ 2.75 कि.मी. बोगदा तयार करण्यासाठी अंदाजे 10 महिन्यांचा कालावधी लागला. बुधवार पेठ मेट्रो स्थानकातील “ब्रेक थ्रू’ चे अंतिम टप्यातील काम पूर्ण झाल्यामुळे, मेट्रोच्या एकूण 12 कि.मी. लांबीच्या भूमिगत बोगद्याचे काम आता 100 टक्के पूर्ण झाले आहे.

पुणे मेट्रोचे एकूण 33.2 कि.मी. लांबीचे दोन कॉरिडॉर आहेत. एक वनाज ते रामवाडी ही उन्नत लाइन आहे आणि दुसरी पिंपरी चिंचवड ते स्वारगेट ही पिंपरी-चिंचवड ते कृषी महाविद्यालय पर्यंत उन्नत आहे, त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या एकूण 23 कि.मी. पैकी 6 कि.मी. भूमिगत मार्ग आहे. यात शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट ही भूमिगत मेट्रो स्थानके असणार आहेत. भूमिगत विभागात अप आणि डाऊन मेट्रो ट्रेनसाठी दोन समांतर बोगद्यांचा समावेश आहे. 6 कि.मी. बोगद्याच्या कामासाठी तीन टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) वापरण्यात आले. या टीबीएमना पुण्यातील मुळा, मुठा आणि पवना या नद्यांची नावे देण्यात आली आहेत.

https://fb.watch/dqLWDoKqZq/

“पुणे मेट्रोच्या बोगद्याचे काम अत्यंत अचूक आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाने करण्यात आले. हे अ12 किमीचा मार्ग पूर्ण झाल्याची खूण मानली जात आहे. महा मेट्रोसाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे. पुण्यातील नागरिक आणि प्रशासकीय संस्थांच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय पुणे मेट्रो प्रकल्पाच्या भूमिगत मार्गाचे काम वेगाने आणि यशस्वीपणे पूर्ण झाले नसते. उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्यासाठी महा मेट्रो कटिबद्ध आहे.”
– डॉ. ब्रिजेश दिक्षीत, व्यवस्थापकीय संचालक महा मेट्रो

“ब्रेक थ्रू’ म्हणजे काय ?
टनेल बोअरिंग मशीनद्वारे बोगद्याच्या खोदाईला सुरूवात झाल्यानंतर हे मशीन भूगर्भातून पुढे पुढे सरकत जाऊन एका विशिष्ट टप्पा पूर्ण करून ते भूगर्भातून बाहेर पडते त्याला “ब्रेक थ्रू’ असे म्हणतात.

यापूर्वी झालेले “ब्रेक थ्रू’?
-सिव्हिल कोर्ट अप लाइन दि. 28 सप्टेंबर 2020
-सिव्हिल कोर्ट डाऊन लाइन दि.7 नोव्हेंबर 2020
-बुधवार पेठ डाऊन लाइन दि.14 जुलै 2021
-बुधवार पेठ अप लाइन दि.23 जुलै 2021
-बुधवार पेठ डाऊन लाइन दि.14 जानेवारी 2022
-बुधवार पेठ अप लाइन दि. 4 जून 2022

आणखी संबंधित बातम्या

Chandrakant Patil: गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मेट्रोने प्रवास

2026-09-25 09:22:50

Chandrakant Patil: गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मेट्रोने प्रवास

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी मोठी खूशखबर! मेट्रो धावणार सलग ४१ तास; पीएमपीएमएलच्या ६२६ जादा गाड्या

2026-09-14 01:45:47

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी मोठी खूशखबर! मेट्रो धावणार सलग ४१ तास; पीएमपीएमएलच्या ६२६ जादा गाड्या

Sunetra Pawar: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधी सुरू होणार? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिले कडक निर्देश

2026-09-11 06:00:51

Sunetra Pawar: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधी सुरू होणार? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिले कडक निर्देश

Pune Metro: गणेशोत्सवात मेट्रोचा मोठा धमाका! यंदा मध्यरात्री २ वाजेपर्यंत धावणार; पाहा नवीन वेळापत्रक

2026-09-10 03:00:59

Pune Metro: गणेशोत्सवात मेट्रोचा मोठा धमाका! यंदा मध्यरात्री २ वाजेपर्यंत धावणार; पाहा नवीन वेळापत्रक

Pune Metro : गणेशोत्सवात पुणे मेट्रोचा मोठा बदल! गर्दीच्या वेळी दर 5 मिनिटांनी मेट्रो; ‘या’ स्थानकाबाबत महत्त्वाचा निर्णय

2026-09-09 20:01:47

Pune Metro : गणेशोत्सवात पुणे मेट्रोचा मोठा बदल! गर्दीच्या वेळी दर 5 मिनिटांनी मेट्रो; ‘या’ स्थानकाबाबत महत्त्वाचा निर्णय