PUNE: पुणे स्टेशन परिसरात पुन्हा मेफेड्रोन विक्री
Updated On:

पुणे – पुणे रेल्वे स्थानक परिसरात मेफेड्रोन (एमडी) ची विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ ने अटक केली. त्याच्याकडून १ लाख ६९ हजार ६०० रुपये किंमतीचे ८. ४८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.
शेबाज शब्बीर कुरेशी (२४, रा. वडाला, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर पुणे रेल्वे स्थानक परिसरात पेट्रोलिंग करत असतांना शेबाज कुरेशी मेफेड्रोनची विक्रीसाठी आला आल्याचे दिसून आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, अंमलदार चेतन गायकवाड, संदीप जाधव यांच्या पथकाने केली.





