पुणे – मध्य रेल्वेच्या वतीने पुणे-लोणावळा दरम्यान इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवारी (दि. २१) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या दरम्यान गाडी क्रमांक १२१६४ एमजीआर चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस सेक्शनमध्ये दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी मेल/एक्स्प्रेस ट्रेनचे रेग्युलेशन करण्यात येणार आहे.
पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५६२, सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५६४, दुपारी ३ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६६ रद्द करण्यात आल्या आहेत. तर शिवाजीनगरहून तळेगावसाठी ३ वाजून ४७ मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५८८, तर पुण्याहून लोणावळ्यासाठी सायंकाळी ४ वाजून २५ मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५६८, तसेच शिवाजीनगरवरून लोणावळ्यासाठी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५७० रद्द करण्यात आल्या आहेत.
लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी १० वाजून ५ मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५५९, लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५६१, तळेगाव येथून पुण्यासाठी सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५८९, लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५६५, लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५६७, लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी ७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६९ रद्द करण्यात आली आहे.