पुण्यातील लोहगावात वीर पत्नींचा सन्मान ! संतोष खांदवे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन
Updated On:

विश्रांतवाडी, दि. 21 (प्रतिनिधी) -देशसेवा करताना शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला. तसेच सैन्य दलातील उच्च पदावर काम केलेल्या सैनिकांनाही सन्मानीत करण्यात आले. भाजप वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्यावतीने सन्मान देशभक्तांचा या उपक्रमाअंतर्गत हा सन्मान करण्यात आला.
यावेळी लहान मुलांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे आयोजन मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष खांदवे यांनी केले होते. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार बापुसाहेब पठारे, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे उपाध्यक्ष एकनाथ खेडकर, सेना परिषद अध्यक्ष नितीन वैद्य, सुनील खांदवे, रावसाहेब राखपसरे, विनित वाजपेयी, संदीप मोझे, संतोष खांदवे, आदित्य खांदवे, रुपेश पवार, बंटी जंगम, वैभव शिंदे, सैन्य अधिकारी उपस्थित होते.





