पुणे – “पुणे बार असोसिएशनच्या परंपरेला साजेसे काम करणार. वकील बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही,’ असा विश्वास पुणे बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड. केतन कोठावळे यांनी येथे व्यक्त केला. सन 2023-24 च्या नवनिर्वाचित कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा शुक्रवारी (दि.3) पार पाडला. त्यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड. केठावळे यांनी मावळते अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी उपाध्यक्ष ऍड. विवेक भरगुडे यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष ऍड. विश्वजित पाटील यांना, उपाध्यक्ष ऍड. लक्ष्मण येळे पाटील यांनी ऍड. जयश्री चौधरी-बिडकर यांना, सचिव ऍड. अमोल शितोळे यांनी ऍड. राहुल कदम यांना, सचिव ऍड. सुरेखा भोसले यांनी ऍड. गंधर्व कवडे यांना, खजिनदार ऍड. प्रथमेश भोईटे यांनी ऍड. समीर बेलदरे यांना, हिशोब तपासणीस ऍड. शिल्पा कदम यांनी ऍड. अजय देवकर यांना पदभार सोपवला. याबरोबरच ऍड. अमोल वडगणे, ऍड. प्रमोद नढे, ऍड. मयुरी कासट, ऍड. संजय खैरे, ऍड. रेश्मा चौधरी, ऍड. श्रद्धा जगताप, ऍड. राहुल प्रभुणे, ऍड. ऋषिकेश कोळपकर, ऍड, चंद्रसेन कुमकर आणि ऍड. सचिन माने या कार्यकारिणी सदस्यांनीही पदभार स्वीकारला. यावेळी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. अमित गिरमे, उपमुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. दिलीप जगताप, ऍड. माधवी पोतदार, ऍड. शरद कुलकर्णी, ऍड. कांताराम नप्ते आणि ऍड. सिद्धेश्वर चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. ऍड. कोठावळे म्हणाले, “मागील कार्यकारिणीने वकिलांच्या हितासाठी व्याख्यानासह विविध उपक्रमांचे आयोजन वर्षभर केले होते. या वर्षात असे उपक्रम सुरूच राहतील. मागील वर्षीपेक्षा जास्त कार्यक्रम, वकिलांच्या हितांच्या उपक्रमांचे आयोजन केले जाईल.’ यावेळी ऍड. थोरवे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात गेल्या वर्षभरात केलेल्या कामाची माहिती दिली. ऍड. अमित गिरमे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.