प्रभात वृत्तसेवा पुणे – मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग वाचविण्यासाठी जैन समाजासह अन्य संघटनांनी पुढाकार घेतलेल्या आंदोलनाला यश मिळाले. त्याबद्दल जैन बोर्डिंगमध्ये शनिवारी विजयोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये अभिनंदन, पीछी परिवर्तन व धर्मोदय वर्षायोग कलश निष्ठापन सोहळा संपन्न झाला. जैन बोर्डिंग येथे आयोजित कार्यक्रमास ज्येष्ठ विधीज्ञ एस.के.जैन, शांतीलाल मुथा, विजयकांत कोठारी, शोभा धारीवाल, अचल जैन, विलास राठोड, लक्ष्मीकांत खाबिया, बाळासाहेब धोका, सीए अशोक पगारिया, डॉ. कल्याण गंगवाल आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मनीष जैन, महावीर शहा, वीरेंद्र शाह, सुजाता शहा, मिलिंद फडे, देवेंद्र बाकलीवाल, स्वप्निल पाटणी, शीतल लोहाडे, अरविंद जैन, एस.पी.जैन, संजोग शहा आदींनी विशेष परिश्रम घेतले. जैन बोर्डिंग जमिनीचा विक्री व्यवहार रद्द व्हावा यासाठी जैन समाजाने आंदोलने केली होती. जैन समाज, संस्था व संघटना, सर्व राजकीय पक्ष, युवक यासह अन्य सर्व घटकांच्या सहकार्यामुळे प्रश्न सुटला. जमीन विक्रीचा व्यवहार रद्द झाल्यामुळे जैन बोर्डिंग वाचविण्याचे सर्व प्रयत्न यशस्वी ठरले. जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी आंदोलनासाठी नेतृत्व सतत महत्वाची भुमिका घेतली. त्यांच्या धैर्य, दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांमुळे जैन समाजाला मिळालेला हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. याबद्दल जैन समाजातर्फे आचार्य गुप्तीनंद महाराज यांना क्रांतिकारी राष्ट्रसंत ही मानाची उपाधी प्रदान करण्यात आली. रविवारी (दि.३०) गुप्तीनंद महाराज पुण्यातून छत्रपती संभाजीनगर येथील धर्मतीर्थाकडे प्रस्थान करणार आहेत. दरम्यान, आंदोलनाची सुरुवात करून संघर्षाचा प्रत्येक टप्पा पार करीत आणि प्रत्येक परिस्थितीत ठामपणे उभे राहून विजय मिळवून देणाऱ्या अक्षय जैन, सीए आनंद कांकरिया, अॅड. योगेश पांडे, स्वप्निल बाफना, स्वप्नील गंगवाल, अण्णा पाटील, चंद्रकात पाटील, सुकौशल जिंतूरकर, महावीर चौगुले सामाजिक कार्यकर्त्यांचा व पत्रकारांचा जैन समाजातर्फे सन्मानचिन्ह व अभिनंदनपत्र देऊन सत्कार करण्यात आला.