Pune : पालेभाज्यांची आवक वाढली
Updated On:

पुणे : मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे मेथीच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे २ रुपये, तर अंबाडीच्या भावात १ रुपयांनी घट झाली आहे, तर आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने शेपूच्या भावात जुडीमागे २ रुपये आणि कांदापात, चाकवतच्या भावात प्रत्येकी १ रुपयांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी निखिल भुजबळ यांनी दिली.
येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. २७) कोथिंबिरीची सुमारे सव्वा लाख जुडींची आवक झाली. ही आवक मागील आठवड्यात ७० हजार जुडी होती, तर मेथीची मागील आठवड्यात ४० हजार जुडी आवक झाली होती.
त्यामध्ये वाढ होऊन आज ६० हजार जुडींची आवक नोंदविण्यात आली. सध्या सर्व प्रकारच्या पालेभाज्यांना चांगली मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.




