Pune : कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनात वाढ
Updated On:

पुणे : कामगार उपायुक्त कार्यालयांच्या आदेशानुसार, महापालिकेकडील कंत्राटी कामगारांच्या वेतनात सरसकट ४९० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हे सुधारीत वेतनदर १ जानेवारी २०२५ ते ३० जून २०२५ पर्यंत असणार आहेत.
कामगार उपायुक्तांना केंद्र शासनाच्या महागाई भत्त्यांच्या अनुषंगाने दर सहा महिन्यांनी वेतनदर जाहीर केले जातात. त्यानुसार ही वाढ केल्याचे कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे यांनी सांगितले.
आता कुशल कामागारास १४ हजार मूळ वेतन अधिक ९ हजार १०० रुपये विशेष भत्ता असे २३ हजार १०० रुपये वेतन दिले जाणार आहे. अर्धकुशल कामगारास १३ हजार मूळ वेतन अधिक ९ हजार १०० रुपये विशेष भत्ता असे २२ हजार १०० रुपये वेतन असेल.
अकुशल कामगारास ११ हजार ५०० मूळ वेतनासह ९ हजार १०० रुपये, विशेष भत्ता असे २० हजार ६०० रुपये वेतन दिले जाणार असल्याचे केंजळे यांनी सांगितले.




