पुणे – 4 दिवसांत 51 कोटी 48 लाख मिळकतकर जमा

पुणे – महापालिकेच्या मिळकतकर विभागाने सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी मिळकतकर आकारणीला सुरुवात केली असून, एक ते चार एप्रिल या कालावधीत 51 कोटी 48 लाख रुपये मिळकतकर जमा करण्यात आला आहे.

नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू झाले आहे. यावर्षीच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी पहिल्या दिवशीपासूनच नियोजन करण्यात आले असून, मिळकतकराच्या बिलाचे वाटप 27 मार्चपासूनच पोस्टामार्फत सुरू करण्यात आले आहे.

गेल्या चार दिवसांत 41 हजार 914 नागरिकांनी ऑनलाइन आणि डिजीटल प्रणालीद्वारे 37.40 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. 5,980 इतक्‍या मिळकतधारकांकडून 8 कोटी 49 लाख इतकी रक्‍कम धनादेशाद्वारे जमा करण्यात आली आहे. तर 9,351 इतक्‍या मिळकतधारकांचे मिळून 5 कोटी 58 लाख रुपये जमा झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.