Pune : उपनगरांत जोरदार पाऊस हडपसर, कात्रज, आंबेगाव, धायरीत मुसळधार

पुणे – सलग दुसऱ्या दिवशी शहराच्या हडपसर, कात्रज, आंबेगाव, धायरी परिसरात सायंकाळी चारनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, शहराच्या उर्वरित भागांत हलक्या सरी झाल्या. त्यामुळे दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला. सायंकाळी साडेपाचवाजेपर्यंत हडपसर येथे सर्वाधिक १३ मि.मी. पाऊस झाला.
शनिवारी (दि. 18) सकाळपासून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. दुपारी उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. तीननंतर आकाशात काळे ढग दाटून आले आणि हडपसर, मगरपट्टा, कात्रज, उंड्री, आंबेगाव, जांभूळवाडी, धायरी आणि नऱ्हे परिसरात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले, रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले.
तर काही भागात झाडपडीच्या घटना घडल्या. चौकांमध्ये पाणी साचल्यामुळे काहीकाळ वाहतूक संथ झाली होती. दरम्यान, शहरासह जिल्ह्यातल् पुढील दोन दिवस दुपारनंतर बेमोसमी पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
शहरासह जिल्ह्यात सायंकाळी साडेपाचपर्यंत झालेला पाऊस (मिमी मध्ये)
हडपसर – 13, बारामती, मगरपट्टा आणि एनडीए – 3, लवासा आणि कोरेगांव पार्क – 1





