पुणे : आपत्कालीन परिस्थिती व अपरिहार्य कारणास्तव रेल्वे विभागाकडून रद्द केलेली हडपसर-जोधपूर-हडपसर सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आली असल्याची माहिती पुणे रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. भारत-पाकिस्तान युद्धामुळे देशाच्या सीमाभागातील राज्यांमध्ये अलर्ट असून, या राज्यांमध्ये जाणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर हडपसर-जोधपूर-हडपसर रेल्वेसेवा रद्द आणि पुणे-जम्मू तवी-पुणे एक्सप्रेस सेवा दिल्लीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, परिस्थिती आटोक्यात आल्याने रेल्वे विभागाकडून रद्द केलेली सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दि. ११ मे पासून हडपसर-जोधपूर-हडपसर सेवा पूर्ववत करण्यात आली आहे, तर पुणे-जम्मू तवी एक्सप्रेस आता दिल्लीपर्यंत न धावता शेवटच्या स्थानकापर्यंत धावणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.