Pune : एचए कंपनीला गतवैभव मिळवून देणार : खासदार डॉ. कुलकर्णी

पुणे : हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ही पुणे जिल्ह्यातील ७० वर्षे जुनी कंपनी असून या कंपनीला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिले.
एचए कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कंपनीत त्यांची भेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यवस्थापकीय संचालक नीरजा सराफआणि अन्य प्रमुखांची बैठक घेऊन कंपनीच्या आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा घेण्यात आली. त्यानंतर कर्मचारी वर्गाच्या जाहीर सभेला त्यांनी संबोधित केले.
केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन औषध निर्मिती संबंधीच्या विविध प्रश्नांबाबत तसेच कर्मचाऱ्यांची थकीत बाकी आणि प्रलंबित पगार वाढ याबाबत चर्चा करून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी नड्डा यांच्या समवेत कंपनीचे प्रशासन, कर्मचारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांना एकत्रित घेऊन बैठकीचे आयोजन करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे खा. डॉ. कुलकर्णी यांनी आश्वासन दिले.
यावेळी भारतीय मजदूर संघाचे बाळासाहेब भुजबळ, सरचिटणीस विजय पाटील, बाळासाहेब जाधव, धनंजय देशमुख, अनिल ढुमणे, गोपीनाथ शेळके, राजेंद्र जाधव, पंडितराव पवार, उमेश कुलकर्णी, अनिल चांदणे, रवींद्र चव्हाण, सुजाता तांबे, कैलास शिंदे, शिवप्रसाद करमकर, विनायक बोरखडे, दीपक कदम, दिलीप खेडेकर, राजेंद्र सावंत, अनिल गाडे आदी उपस्थित होते.





