शिक्रापूर -शिक्रापूर चाकण रस्त्यावर हॉटेल ग्रीन पॉइंट हॉटेल समोर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. तेजस कुंडलिक भोगाडे असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर करण ऊर्फ अनिल डोईफोडे हा युवक गंभीर जखमी झाला. ल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.