रांजणगाव गणपती – येथील औद्योगिक वसाहतीमधील कंपनीत काम करणाऱ्या कामगाराला एकाने मारहाण केली. रवीकांत रवींद्र कुशावह (वय 29, रा. धारमाला, मध्य प्रदेश, सध्या रा. कारेगाव) यांनी रांजणगाव पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 29 नोव्हेंबर रोजी 11 वाजण्याच्या सुमारास कारेगाव गावाच्या हद्दीत याझाकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मेन गेटसमोर 20 ते 22 वयोगटातील चार आरोपींनी काही कारण नसताना फिर्यादीस मारहाण केली.
त्यापैकी एकाने फिर्यादीच्या डाव्या बाजूच्या लोखंडी गजाने मारहाण केली आहेत. यात कामगार जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे हे करीत आहेत.