वाल्हे/नीरा -औद्योगिक वसाहतीत सुरक्षित वातावरण कसे राहील हा पाहणे आता गरजेचे झाले आहे. सुरक्षिततेला प्राधान्य दिलेच पाहिजे. युवक-युवतींच्या कमाच्या ठिकाणी सुरक्षा प्रथम बाकी नंतर. या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, जर कंपनी दोषी असेल तर त्यांना महाराष्ट्र शासनाने नोटीस ही दिलीच पाहिजे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी राख येथ माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
जेजुरी एम.आय.डी.सीच्या बर्जर पन्टस् या रंग कंपनीत राख (ता.पुरंदर) येथील युवक रोहित जयवंत माने याचा अपघाती मृत्यू झाला होत. या युवकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन खासदार सुळे यांनी बुधवारी (दि. 4) सकाळी केले. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, कात्रज डेअरीचे संचालक माऊली जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, युवक अध्यक्ष संदेश पवार, महेंद्र माने यांच्यासह बर्जर कंपनीतील कामगार उपस्थित होते.
जेजुरी औद्योगिक क्षेत्रातील बर्जर पेन्टस् या रंग बनवण्याच्या कंपनीतील बॉयलरमध्ये शुक्रवारी (दि. 30 डिसेंबर) रात्री आठ वाजता स्फोट झाला. रंग तयार करण्यासाठी लागणारी कच्ची पावडर गुळगुळीत करण्याच्या बॉयलरमध्ये मोठे लोखंडी गोळे असतात, ते गोळे बॉयलरची भिंत फोडून बाहेर आले.
या अपघात राख येथील रोहित जयवंतराव माने या 28 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघाता बाबत कमालाची गुप्तता बाळगली जात होती. कोतताही मोबदला जाहीर न करता माने यांचा मृतदेह ससून रुगणालयातून नातेवाइकांकडे सोपवण्यात आला होता; मात्र कंपनीतील कामागारांनी आंदोलनाची भूमिका घेत गेली तीन दिवस रात्र ठिय्या आंदोलन सुरू ठेवले. बुधवारी खासदार सुळे यांनी सकाळी माने यांच्या निवासस्थानी व नंतर बर्जर पेन्टस् कंपनीच्या गेटवर कामगारांची भेट घेतली.
कामगारांना सुविधा नाही?
जेजुरी एम.आय.डी.सी. मधिल बर्जर पेंटस या कंपनीत तीनशेच्या वर युवक कामगार आहेत. मात्र कंपनीने हे सर्व कामगार कंपनीतर्फे न घेता, ठेकेदारांकडून पुरवले जातात. या कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे कोणत्या ही सुविधा पुरवल्या जात नाहीत, असे कामगारांनी खासदार सुळे यांना सांगितले.