भिगवण – क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याद्वारे भारतीतील शिक्षणाचे आधुनिक लोकशाही युग अवतरले. या सर्वसामान्य व आपणासारख्या हाडामासाच्या दांपत्याने केलेल्या अलौकिक कायामुळे इतिहासालाही दखल घ्यावी लागली. त्यातूनच आजच्या 21व्या शतकातील मुली शिक्षण व विविध क्षेत्रात भरीव योगदान देत आहेत. आजच्या मुलींच्या यशाची वैचारिक पायाभरणी सावित्रीबाई फुले यांनी 19व्या शतकातच करून ठेवली होती. या योगदानाची जाणीव आजच्या पिढीने ठेवायला हवी, असे प्रतिपादन सुहास गलांडे यांनीकेले. कला महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज होते. डॉ. वाळुंज म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य काळाच्या पुढे जाणारे होते. पुणे विद्यापीठाचे नामांतर करुन त्यास सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे हे सावित्रीबाई यांच्या जीवनातील त्यागाला व समाजाप्रती समर्पणाच्या भावणेला साजेशे होते. एवढेच नव्हे तर त्यात स्त्रीयांप्रती समताभाव प्रदर्शित होतो. यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे, प्रा. पद्माकर गाडेकर, डॉ. प्रशांत चवरे, प्रा. कविता देवकाते, प्रा. शाम सातर्ले आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुरेंद्र शिरसट यांनी तर प्रा. भाऊसो सकुंडे यांनी आभार मानले.