सविंदणे -कांद्याला हमी भाव मिळावा, शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी वीजबिल माफ करावे, वीजपुरवठा खंडित करणे थांबवावे, शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी यांसह शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पार्टी, जनता दल (सेक्युलर) व मित्र पक्षाच्या वतीने पुणे-नगर महामार्गावर शिरूरजवळ न्हावरेफाटा येथे केंद्र व राज्य शासनाचा निषेध करत महामार्गावर कांदे टाकून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिरूर नायब तहसीलदार महेश काळेगावकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी न्हावरे फाटा येथे पुणे-नगर रस्ता काही काळ आंदोलकांनी आडवून धरला होता, काही काळ वाहतूक खोळंबी होती. कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. कांद्याला, कापसाला बाजारभाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याला दिवसा वीज मिळालीच पाहिजे. वीज तोडणी, शेतमालाला बाजारभाव व आधारभूत किंमत मिळालीच पाहिजे. या घोषणा यावेळी देण्यात आल्या. सरकारने शेतकऱ्यांना वीजबिल, कर्ज माफ करणे गरजेचे आहे. या विरोधात कोणतेही प्रस्थापित पक्ष आवाज उठवत नसल्याची खंत यावेळी व्यक्त केली. यावेळी रासपचे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे, तालुका अध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे, जिल्हा संघटक तान्हाजी शिंगाडे, जनता दल जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, शिवाजी खेडकर, रासपा नेते रामकृष्ण बिडगर, शिरूर -आबेगाव विधानसभा अध्यक्ष किरण शिंदे, उपाध्यक्ष संताजी तिखोळे, शिरूर – आंबेगाव रासपा युवक अध्यक्ष किरण शेडगे, आपचे शिरूर शहराध्यक्ष अनिल डांगे, अनिल बांडे, नाथाभाऊ पाचर्णे, आबा सरोदे, जुन्नर रासपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब घोडे, माजी चेअरमन अशोक माशेरे, सरपंच मल्हारी मलगुंडे, दीपक दुडे पाटील, राजेंद्र कटके, युवा अध्यक्ष संदीप देवकाते, शहराध्यक्ष सिकंदर पटेल, उपाध्यक्ष नितीन धरणे, राजेंद्र देवकाते, देविदास पवार, विलास रोहीले, सुरेश उचाळे, अँन्ड रतन बिडगर – पांडोळे, वंदना बोबडे, रूपेश ढवण, नामदेव घुले उपस्थित होते.