सासवड -रुग्णांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे प्रतिपादन आमदार संजय जगताप यांनी केले. सासवड येथे पुरंदर-हवेलीचे आमदार संजय चंदूकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वनिरंजन नेत्र रूग्णालय आणि विश्वराज हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 13) आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा सुमारे 600 जणांनी लाभ घेतला. याप्रसंगी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदकुमार जगताप,
तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, पंचायत समितीच्या माजी सदस्या सुनीता कोलते, माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, ज्येष्ठ नगरसेवक यशवंतकाका जगताप, वामनराव जगताप, सुहास लांडगे, संजय ग. जगताप, अजित जगताप, गणेश जगताप, उद्योजक आर. डी. जगताप, पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. वृषाली जगताप, सचिव डॉ. सुमित काकडे, ऍड. पूनम शिंदे, ऍड. सौरभ वढणे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यामध्ये रक्तदाब, मधुमेह, ईसीजी, हृदयरोग, स्त्री रोग, दंत तपासणी आणि जनरल तपासणी अशा मोफत तपासण्या करून औषधोपचार करण्यात आले. तसेच पुढील आरोग्य सुविधांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रवीण जगताप, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुरज इंगवले, दंतरोग तज्ज्ञ डॉ. उमाकांत ढवळे, नेत्रतज्ज्ञ डॉ. अश्विनी जगताप तसेच विश्वराज हॉस्पीटलचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या तपासण्या केल्या.
माजी नगरसेवक संतोष खोपडे, कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष संतोष जगताप, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत हिवरकर, सागर जगताप यांनी या शिबिराचे संयोजन केले होते. यावेळी पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, नगरसेवक नंदकुमार जगताप, रवींद्रपंत जगताप, प्रिया जगताप, निलम होले, संतोष गिरमे,
संभाजी जगताप, माऊली यादव, पै. आण्णा कामथे, सागर जगताप, गजानन जगताप, विकास कामथे, शंतनु झगडे, विठ्ठलराव मोकाशी, दीपक काळे, संभाजी काळाणे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष संजय कामथे, भाग्यवान म्हस्के यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.