इंदापूर – इंदापूर तालुक्यातील कळस भागातील शेतकऱ्यांना, छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगरमध्ये हक्काचे सभासद करण्यासाठी, तात्काळ कारखान्याचे चेअरमन तसेच माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे व स्वतः मी तात्काळ बैठक घेणार आहे. कळस भागातील शेतकऱ्यांना कारखान्यात सभासद करून घेण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिली. कळस (ता. इंदापूर) येथील दिवंगत नेते माजी आमदार गणपतराव पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी आज (1 जानेवारी)भेट देत परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, यांच्यासह शेतकरी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशाली पाटील, प्रतापराव पाटील यांनी वालचंदनगर – कळस जिल्हा परिषद गटाच्या वतीने शरद पवार यांचा सन्मान केला. प्रतापराव पाटील म्हणाले, खडकवासला कॅनॉलच्या अंतर्गत येणारा कळस भाग आहे. पुण्याला पिण्याचे पाणी या नावाखाली उजनी धरणातून पाणी देण्यात आले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. विरोधी पक्ष नेते अजित पवार, सुप्रिया सुळे व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत उजनी धरणातून या भागाला पाणी मिळणारी योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळवली; मात्र काही कारणामुळे या योजनेला खो बसला. ही योजना झाली पाहिजे अशी अपेक्षा प्रतापराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त केली. यावेळी सरपंच वृषाली पाटील, विठ्ठल पाटील, नारायण हारोळे, दादासाहेब वायाळ, संतोष खारतोडे, गजानन खारतोडे, उपसरपंच विशाल भोसले, सोसायटीचे चेअरमन गजानन खरतोडे, धनंजय गावडे, मुगाजी सागळे, दादा सांगळे, धनंजय सांगळे, सुनिल ओमासे, दिलीप कटके, राजू खरात, संजय दोशी, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर, अनिकेत भरणे, संग्रामसिंह पाटील, बाळासाहेब करगळ, सुभाष पाटील, हनुमंत कोकाटे, हनुमंत बंडगर, प्रताप चवरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. छत्रपती सहकारी साखर कारखान्याला कळस परिसरातील सर्व गावे जोडून, ऊस गाळपाचा प्रश्न निकाली काढावा. तसेच द्राक्ष बागा आच्छादन झाकण्यासाठी, शासनाकडून अनुदानावर शेतकऱ्यांसाठी पेपर मिळावा. – -प्रतापराव पाटील, माजी सदस्य जिल्हा परिषद