इंदापूर – शहाजीनगर रेडा येथील दत्त देवस्थानमुळे, परिसराला चैतन्य मिळाले आहे. धार्मिक सामाजिक व अन्नदानाचे हरिनामाचे कार्य या देवस्थानच्या माध्यमातून अखंड चालले असून, तालुक्यातील व तालुकाबाहेरील भक्तगणांचे श्रद्धास्थान दत्त देवस्थान ठरले आहे. असे गौरवोद्गार इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील यांनी काढले. श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त शहाजीनगर रेडा येथील दत्त देवस्थान येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह गुरुचरित्र पारायणाची सुरुवात, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या हस्ते विणापूजन, गुरुचरित्र पूजन करून गुरुवारी (दि. 1) करण्यात आली. गणेश पूजन, टाळ मृदंग पूजन इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांच्या हस्ते पार पडले. उपस्थितांचे स्वागत दत्त देवस्थानचे प्रमुख नीलकंठ मोहिते, तानाजीराव गायकवाड यांनी केले. पहाटेची महापूजा रेडा गावच्या सरपंच सुनिता नानासाहेब देवकर, युवक नेते नानासाहेब देवकर, उपसरपंच सचिन हरिदास देवकर, भाग्यश्री सचिन देवकर यांच्या हस्ते पार पडली. यावेळी उपस्थित भक्तगणांना माजी सभापती पाटील मार्गदर्शन करीत होते. पाटील म्हणाले, इंदापूर तालुका व माळशिरस तालुका या दोन्हीही तालुक्यातील ऋणानुबंध, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे अधिकचे घट्ट झालेले आहेत. त्यामुळेच नव्या पिढीला सुसंस्कृत आदर्श माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ठरत आहेत, अशीही माहिती पाटील यांनी दिली. यावेळी रेडा गावच्या माजी उपसरपंच बायडाबाई बाबर, हभप तुकाराम महाराज काळकुटे, सिने अभिनेते शिवकुमार गुणवरे, हभप तानाजी देवकर, गजेंद्र शिंदे, प्रसाद देवकर पाटील, विकीन गुळवे, डॉ. धर्मराज देवकर, गणपत लवटे, माजी सभापती नितीन वाघमोडे, सतीश राऊत, श्याम इनामे, सोमनाथ मोहिते, पांडुरंग मोहिते, यांच्यासह दत्तभक्त उपस्थित होते. कैलास पवार यांनी आभार मानले.