वाफगाव – कनेरसर (ता. खेड) येथे पौष पौर्णिमेनिमित्त श्री यमाई देवी यात्रा उत्सव संस्थेमार्फत गुरुवार (दि. 5) ते शनिवार (दि. 7) पर्यंत बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप माशेरे व उपाध्यक्ष सुहास दौंडकर यांनी दिली. फळीफोड, फायनल, घाटाचा राजा यासाठी मोठी बक्षिसे ठेवली असल्याची माहिती यात्रा कमिटीचे प्रशांत म्हसुडगे, बाबाजी दौंडकर, शिवाजी कानडे, दादाभाऊ घाडगे यांनी दिली. बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन खेडचे आमदार दिलीप मोहिते व दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे हे करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, बाबाजी काळे, युवा नेते मयूर मोहिते, विजय शिंदे, सचिन लांडगे हे उपस्थित राहणार असल्याचे सरपंच सुनीता केदारी यांनी सांगितले. रविवारी (दि. 8) कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन केले असून मनोरंजनासाठी पायल सावंत याच्या लोकनाट्य तमाशाही आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनेक वर्षे बैलगाडा शर्यतीच बंद होत्या ,सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले.