पुणे – वाढता उन्हाळ्यामुळे धरण.. तलाव अशा अनेक पर्यटन ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. खबरदारी म्हणून स्थानिक प्रशासनाकडून देखील काळजी घेतली जात आहे. अशात खडकवासला डोणजे गोरे गाव येथे काही मुली पोहायला गेल्या असता त्यातील दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
सकाळी एकूण नऊ मुली गोरे बुद्रुक येथील कलमाडी फार्मच्या मागील बाजूस पोहण्यासाठी गेल्या होत्या. त्यातील सात मुली पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यामध्ये उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने अपघात झाला. त्यातील पाच मुलींना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले. मात्र दोन मुली मिसिंग होत्या.
सात पैकी दोन मुली बुडाल्याची माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन दलाने त्यांचा शोध सुरु केला. शोधानंतर दोन्हही मुलींचे मृतदेह पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी पाण्याबाहेर काढले.
अग्निशमन दलासह यावेळी स्थानिक पोलिसही उपस्थित होते. त्यासह १०८ क्रमांकावरून शासकीय रुग्णवाहिकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. सर्व मुली बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
खडकवासला धरण क्षेत्रात पोहायला गेलेल़्या ९ मुल़ींपैकी दोघींचा बुडून मृत्यू झाला. ही अतिशय दुःखद घटना असून या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलींना भावपूर्ण श्रद्धांजली. उर्वरित सात जणींना स्थानिक नागरीकांच्या सतर्कतेमुळे वाचविण्यात यश मिळाले. स्थानिक पोलीस तसेच पीएमआरडीएच्या अग्निशमन…
— Supriya Sule (@supriya_sule) May 15, 2023