पुणे : मासेमारीवर असलेली बंदी आणि चक्रीवादळामुळे बोटी परतल्याने बाजारात मासळीची घटलेली आवक कायम आहे. परिणामी, मासळीचे तेजीतील दर कायम आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटणाचे भाव तेजीत आहेत. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने चिकनच्या भावात किलोमागे वीस रुपये, गावरान अंडी शेकड्यामागे शंभर रुपयांनी वाढली. इंग्लिश अंडी पन्नास रुपयांनी उतरली आहेत. बाजारात मागणी इतकाच पुरवठा होत असल्याने मटणाचे भाव टिकून आहेत. गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (दि. १५) खोल समुद्रातील मासळी 5 ते 7 टन, खाडीच्या मासळीची 100 ते 200 किलो आणि नदीच्या मासळीची 4 ते 5 टन इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे 25 ते 30 टन इतकी आवक झाली. खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) – पापलेट : कापरी : 2000-2800, मोठे : 1800-2000, मध्यम : 1500-1800, लहान : 1000-1400, भिला : 1000, हलवा : 1200-1400, सुरमई : 1200-1800, रावस : लहान 1000-1100, घोळ : 900-1000, करली : 500-600, ओले बोंबील : 450-500. कोळंबी : लहान : 240-360, मोठी : 400-700, जम्बो प्रॉन्स : 1500-1800, किंग प्रॉन्स : 700-800, मांदेली : 150-200, चिंबोर्या : 600-800. खाडीची मासळी : बेळुंजी : 150, खुबे : 150. नदीतील मासळी : रहू : स्थानिक : 250-300, आंध्र : 150-180, कतला : 150-200, मरळ : 300-500, शिवडा : 250-300, खवली : 250-300, आम्ळी : 150-200, खेकडे : 250-500, चिलापी : 80-200, वाम : 600. मटण : बोकडाचे 780, बोलाईचे 780, खिमा 780, कलेजी 820. चिकन 200, लेगपीस 250, जिवंत कोंबडी 140, बोनलेस 300. अंडी : गावरान (शेकडा) 1020, डझन 130, प्रतिनग 11. इंग्लिश (शेकडा) 580, डझन 80, प्रतिनग 7.