Pune : मासळी बाजारातील तेजी कायम

पुणे : वाढती मागणी आणि त्याच्या तुलनेत घटलेली आवकमुळे मासळीच्या बाजारातील तेजी या आठवड्यातही कायम राहिली. तर पक्षांचा पुरवठा घटल्याने चिकनच्या किमतीत १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, अंडी आणि मटणाचे दर स्थिर राहिले आहेत.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) –
पापलेट : कापरी : 1600, मोठे : 1600, मध्यम : 1200-1400, लहान : 900-1000,
भिला : 700-800, हलवा : 650-750, सुरमई : 600-900, रावस : लहान 750-950, मोठा 900-1000, घोळ : 800-900, करली : 360-400, करंदी (सोललेली) : 440-480, भिंग : 360-400, पाला : 1200-1500, वाम : पिवळी 1000-1200, काळी : 400-500, ओले बोंबील : 300-400. कोळंबी : लहान : 250-300, मोठी : 360-600, जम्बो प्रॉन्स : 1400-1500, किंग प्रॉन्स : 750-850, लॉबस्टर : 1800-2000, मोरी : 300-360, मांदेली : 120-160, राणीमासा : 200-280, खेकडे : 300-400, चिंबोऱ्या : 600-700.
खाडीची मासळी :
सौंदाळे : 240-280, खापी : 320-360, नगली : 600-700, तांबोशी : 500-600, पालू : 300-350, लेपा : 300-350, बांगडा : 140-250, शेवटे : 400, पेडवी : 120-140, बेळुंजी : 180-200, तिसर्या : 300-350, खुबे : 100-160, तारली : 200-240.
नदीतील मासळी : रहू : 160-180, कतला : 160-180, मरळ : 300-500, शिवडा : 200-250, खवली : 250-300, आम्ळी : 80-140, खेकडे : 350-400, चिलापी : 80-180, वाम : 500-600.
मटण : बोकडाचे 780, बोलाईचे 780, खिमा 780, कलेजी 820. चिकन 220, लेगपीस 270, जिवंत कोंबडी 150, बोनलेस 320. अंडी : गावरान (शेकडा) 980, डझन 130, प्रतिनग 11. इंग्लिश (शेकडा) 465, डझन 72, प्रतिनग 6.





