Pune : कुंभमेळ्यासाठी पुण्यातून पहिली विशेष रेल्वे गाडी रवाना
Updated On:

पुणे : प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी पुण्यातून पहिली विशेष ट्रेन बुधवारी रवाना करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात प्रवाशांचे स्वागत करण्यात आले, त्यानंतर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून गाडी प्रयागराजच्या दिशेने मार्गस्थ झाली.
“आयआरसीटीसी’मार्फत भारत गौरवची विशेष ट्रेन पुण्याहून बुधवारी (दि. १५) सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटली. ज्येष्ठ प्रवाशाच्या हस्ते फीत कापून या गाडीचे उद्घाटन करण्यात आले.
ही ट्रेन पुणे, वाराणसी, प्रयागराज, अयोध्या, पुणे अशी धावणार आहे. यावेळी रेल्वेच्या पुणे विभागाचे झोनल मॅनेजर गुरूराज सोन्ना यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.





