PUNE पुरंदर गडावर रंगला पिता-पुत्र भेटीचा सोहळा

मंचर – स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य आयोजित श्री शिवनेरी गड आणि श्री पुरंदरगड छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभू महाराज या पिता-पुत्रांच्या भेटीचा पाच दिवसांचा पालखी सोहळा स्वराज्य संघाचे अध्यक्ष बाजीराव महाराज बांगर यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडला. श्री पुरंदर गडावर पिता-पुत्र भेटीचा सोहळा अतिशय थाटामाटात झाल्याची माहिती स्वराज्य संघाचे संपर्कप्रमुख दिलीप पवळे व सचिव शामकांत निघोट यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या पिता पुत्राच्या अखेरच्या क्षणी भेट झाली नाही, म्हणून ही अधुरी राहिलेली भेट या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून प्रतिवर्ष घडवून आणली जाते. पालखी सोहळ्याचे हे सहावे वर्ष होते. पुरंदर गडावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज पिता-पुत्र भेटीचा सोहळा पुष्पवृष्टी करून व मानवंदना देऊन मंत्रघोषात पूर्ण झाला. यामध्ये अनेक शिवभक्तांचे योगदान लाभले. याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेनेही सहकार्य केले.
या सोहळ्यामध्ये पालखी मार्गातील नियोजन उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे यांनी केले. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली, पुरंदर या परिसरातील अनेक शिवभक्तांनीही सहकार्य केले. या सोहळ्यामध्ये राम पाटील, वनाजी बांगर, संतोष गावडे, नाना जैद, दीपांशू खानदेशी, ओंकार चव्हाण, सूरज मस्करे, प्रमोद टेमगिरे, विशाल दिघे, बबन पोखरकर, मारुती पोखरकर, शंकर कुमकर, रोहिदास बटवाल, माऊली वंडेकर, शंकर धंदरे, संतोष पारधी, प्रशांत मुंगसे, लक्ष्मण वेताळ, शहाजी इंदोरे, सागर बांगर, संतोष बांगर, सुमन बांगर, शिवम खोपडे, राम कुंभार, शिवशरण स्वामी, नामदेव बांगर, जितेंद्र बांगर, प्रशांत मुंगसे असे अनेक शिवभक्त पालखी सहभागी झाले होते.





