हडपसर – हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी (दि. 28) सायंकाळी कोंढवा बुद्रुक येथील चोरडिया कॉर्नर, साळवे गार्डनशेजारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, पुणे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. सोबतच मराठी व हिंदी लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम (संगीत जल्लोष) होणार आहे. “ऐका दाजीबा’ फेम वैशाली सामंत यांचे गीत गायन यावेळी होणार आहे. दरम्यान, या सोहळ्याला जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन हडपसर भाजपचे अध्यक्ष संदीप दळवी, माजी नगरसेविका विजया वाडकर, हडपसर विधानसभा भाजप महिला अध्यक्षा स्वाती कुरणे यांनी केले आहे.