Pune: जर्मनीतील उद्योजकाची मार्केट यार्डास भेट

पुणे : जर्मनीतील हॅम्बुर्ग येथील लिंबू उत्पादक व डॉ. लिकन कंपनीचे मालक अॅड्रेस शिंडलर यांनी मार्केट यार्डातील लिंबाचे व्यापारी रोहन जाधव यांच्या गाळ्याला भेट दिली. त्यामध्ये त्यांनी लिंबाचा दैनंदिन बाजार कसा चालतो. आवक, विक्रीची प्रक्रिया, मिळणारा दर, निर्यातीची व्यवस्था आदी गोष्टी जाणून घेतल्या.
भारतीय बाजारपेठ जगासाठी कायमच आकर्षणाचे केंद्र राहिली आहे, तसेच येथील बाजारपेठेत सर्व प्रकारचा माल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे या बाजारातून माल खरेदीसह विदेशातील माल या बाजारपेठेत पाठविण्यासाठी नेमके काय काय करावे लागेल.
विक्रीच्या दृष्टीने मालाची आदान प्रदान करणे शक्य आहे का? याचाही अंदाज शिंडलर यांनी घेतला. या वेळी व्यापारी मिलिंद जाधव, रोहन उरसळ आदी उपस्थित होते.
जर्मनची लिंबे पुण्यात पाठविली तर काय दर मिळेल, किंवा किती प्रमाणात लिंबे पाठवावी लागतील, याबाबत शिंडलर यांनी चौकशी केली असल्याची माहिती जाधव यांनी दिली.
फोटो संदीपने सोडला आहे





