पुणे – महावितरण वीज कंपनीने ग्राहकांना ऐन उन्हाळ्यात विजेच्या दरात वाढ केल्याने सर्वसामान्य जनतेला मोठा धक्का बसला आहे. महावितरणने ग्राहकांना 2023-24 मध्ये सरासरी 2.9 टक्के तर 2024-25 साठी 5.6 टक्के दरवाढ केली आहे. घरगुती विजेच्या दरात यावर्षी व पुढच्या वर्षी सहा टक्के वाढ झाली आहे.
इंधन आणि गॅस दरवाढीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्यांना आता वीज कंपन्यांनी आणखी एक मोठा झटका दिला आहे. आता महाराष्ट्रातील वीज वितरण कंपन्यांनी प्रतियुनिट विजेच्या दरात मोठी वाढ केली असून, नवीन दरवाढ शनिवारपासून (दि. 1) पासून लागू केली आहे. कंपन्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे कारण देत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने विजेच्या दरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे आता ऐन उन्हाळ्यात राज्यातील ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.
आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्यांना वीज दरवाढीमुळे मोठा आर्थिक शॉक बसणार आहे. दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून राज्यात वीज दरवाढ होणार असल्याच्या चर्चा होत्या. यापूर्वी वीज कंपन्यांनी दरवाढीचा प्रस्तावही सादर केला होता. त्यानंतर आता कंपन्यांनी विजेच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सामान्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
सरासरी दरवाढ
2023-24 : सरासरी 2.9 टक्के
2024-25 : सरकारी 5.6 टक्के
घरगुती विजेच्या दरात सहा टक्के वाढ