Pune : एमएसआरडीसीकडून 117 गावांचा डीपी लवकरच

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 137 कि. मी. लांबीचा पुणे रिंग रोड प्रकल्प हाती घेतला आहे. राज्य शासनाने या रिंगरोडलगतच्या पाच तालुक्यातील 117 गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीची नियुक्ती केली आहे. त्यानुसार आता एमएसआरडीसीने 117 गावांचा विकास आराखडा करण्याचा इरादा प्रसिध्द केला असून, येत्या आठ महिन्यांत हा विकास आराखडा (डीपी) तयार करणार असल्याचे सांगण्यात आले.
रिंगरोडसाठी आवश्यक असलेल्या जागेचे संपादन एमएसआरडीसीकडून करण्यात येत आहे. या रिंगरोड लगत दोन विकास केंद्रे प्रस्तावित असून, ही दोन्ही विकास केंद्रे एमएसआरडीसीकडून विकसित करण्याचा इरादा शासनाने जाहीर केला आहे. या 117 गावांमधील सुमारे 668 चौ.कि.मी. इतक्या क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसी काम पाहणार आहे.
रिंगरोड प्रकल्पाच्या विकासाशी संबधित खर्चाची भरपाई विचारात घेता भूसंपादनासाठी लागणारा निधी उभरण्यासठी विविध मॉडेल्सचा वापर करून या प्रदेशातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यटन सुलभ करण्यासाचे कामही एमएसआरडीसी कडे सोपविण्यात आले आहे. या गावातील बांधकाम परवानगीचे अधिकारही त्यांच्याकडेच असतील.
या गावांचा होणार विकास आराखडा (तालुका निहाय)
* हवेली – गोगलवाडी, माळखेड, मांडवी खुर्द, मांडवी बुद्रुक, खडकवाडी, माणेरवाडी, खानापूर,थोपटेवाडी, गोरे खुर्द, गोरे बुद्रुक, आगळंबे, जांभळी, भगतवाडी, घेरा सिंहगड, डोणजे, वांजळेवाडी, खाडेवाडी, बहुली, सोनापूर, वरदाडे, संभारेवाडी, खामगाव मावळ, मोगरवाडी, कुडजे, मोकरवाडी
* भोर – भांबवडे, भोंगवली, धनगवाडी, गुणंद, केंजळ, खडकी, मोरवाडी, न्हावी, निगडे, पांदे, पांजळवाडी, राजापूर, सांगवी खुर्द, सारोळे, सवर्डरे, तपरेवाडी,उंबरे, वाठार खुर्द, वाघजवाडी, देगाव, दिडघर, जांभळी, कंबारे, कंजाळे, करांदी, केटकवणे, खोपे, कोळवाडी, कुरुंगवाडी, कुसगाव, माळेगाव, पर्वडी, रांजे, सालवडे, सांगवी बुद्रुक, सोनवाडी, विरवाडी
* पुरंदर – कोडित खुर्द, पुर, पोखर, वारवाडी ,कुंभोशी, सोमुर्डी, घेरापुरंदर, सुपे खुर्द, मिसळवाडी, थापेवाडी, भिवरी, भिवडी, बहीरवाडी, भोपगाव, पाथरवाडी, पिंपळे, पानवडी, हिवरे, कोडित बुद्रुक, अस्करवाडी, चांबळी, बोरहळेवाडी, गारडे
* मुळशी – मुठा, बोतरवाडी, आंदगाव, खारावडे, साईव खुर्द, काटवडी ,डावजे , माळेगाव, वाजले, वातुंडे, जातेडे, चिंचवड, कोंढूर, चिखली बुद्रुक, बेलावडे, दरवळी, भरेकरवाडी, मोरेवाडी, विठ्ठलवाडी, टेमघर, खेचरे, मारणेवाडी, कोंढवले
* वेल्हे – वरसगाव, कुरण बुद्रुक, मोसे बुद्रुक, साईव बुद्रुक, ओसाडे, निगडे मोसे





