24 तासात 2 हजार 32 नवीन करोनाबाधित

बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे करोनामुक्‍तीचा वेग कमी

 

पुणे – पुणे विभागात गेल्या 24 तासात तब्बल 2 हजार 32 बाधित सापडले. या महिन्यात पहिल्यांदाच दोन हजाराच्या पुढे गेलेली बाधित संख्या चिंतेची बाब आहे. त्यामध्ये सर्वाधिक बाधित हे पुणे जिल्ह्यात 1 हजार 714 इतकी आहे. सातारामध्ये 131, सोलापूर 104, सांगली 35, तर कोल्हापूर जिल्ह्यात 48 बाधित सापडले आहेत. बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे विभागातील करोनामुक्‍तीचा वेग कमी झाला असून, 935 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी दिली.

विभागातील एकूण करोनाबाधित संख्या 6 लाख 23 हजार 300 वर पोहोचली आहे. त्यातील 5 लाख 92 हजार 666 करोनामुक्‍त झाले असून, जवळपास 95.9 टक्‍के बाधित बरे झाले आहेत. विभागात करोनामुळे मृत्यूचे प्रमाण 2.63 टक्‍के असून, आतापर्यंत 16 हजार 379 जणांचा मृत्युची नोंद झाली आहे. तर, 14 हजार 255 बाधितांवर सध्या उपचार सुरू आहे.

बाधितांच्या वाढत्या प्रमाणामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 4 लाख 11 हजार 843 बाधित असून, त्यातील 3 लाख 91 हजार 247 जण बरे झाले आहेत. पुण्यातील मृत्यूदर 2.23, तर करोनामुक्‍तीचे प्रमाण 95 टक्‍के आहे. मागील महिन्याभरात वाढलेल्या बाधित संख्येमुळे पुणे शहरासह ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 11 हजार 423 जणांवर उपचार सुरू आहे.

सातारा जिल्ह्यात 59 हजार 107 बाधितांपैकी 55 हजार 893 बरे झाले आहे. 1 हजार 361 जणांवर सध्या उपचार सुरू असून, आतापर्यंत करोनामुळे 1 हजार 853 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 53 हजार 224 बाधितांपैकी 50 हजार 460 रुग्ण बरे झाले. 917 जणांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत जिल्ह्यात करोनामुळे 1 हजार 847 जणांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात सर्वात कमी सक्रिय बाधितांची संख्या असून, 187 जणांवर सध्या उपचार सुरू आहे.

एकूण 48 हजार 573 रुग्णांपैकी 46 हजार 625 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 1 हजार 761 जणांचा मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यात 50 हजार 553 बाधितांपैकी 48 हजार 441 रुग्ण बरे झाले आहे. 367 जणांवर सध्या उपचार सुरू असून, 1 हजार 745 जणांचा मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.