रांजणगाव गणपती : पिंपरी दुमाला (ता. शिरूर) येथे २१ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार आंबेगाव विधानसभा अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर व पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शिरूर खरेदी-विक्रीचे संचालक लहू थोरात, माजी संचालक दत्तात्रय कदम, सरपंच महेंद्र डोळस, उपसरपंच निकिता विजय खेडकर, माजी उपसरपंच माणिक म्हाळसकर मळ, जयश्री संदीप सोनवणे, शरद खळदकर, सदस्य तेजश्री चिखले, देवस्थानचे अध्यक्ष अभिषेक शेळके, माजी अध्यक्ष सुनील सोनवणे, तंटामुक्तीचे अध्यक्ष अमोल चिखले, खजिनदार शेखर पाटेकर, सचिव श्रीकांत सोनवणे, माजी उपसरपंच अशोक दुर्गे, पोलीस पाटील संतोष जाधव, कोमल डोळस, कचरदास डोळस आदी उपस्थित होते. यावेळी गावच्या जोड रस्त्याचे व गावातील काँक्रिटीकरण कामांचे भूमिपूजन करण्यात आले.