शरद पवार : आमदार जगतापांच्या प्रचारार्थ सासवडमध्ये सभा सासवड – राज्यामध्ये महिला सुरक्षित नसून 67381 महिलांवर अत्याचार गुन्हे दाखल आहेत. मात्र कोणालाही न्याय मिळत नाही. 67 हजार महिला बेपत्ता आहेत. ज्यांच्याकडे गृहखात आहे ते त्याच्याकडे लक्ष देत नाही. केवळ लाडकी बहीण म्हणून महिलांचा सन्मान राहणार नाही किंवा महिलांचा विकास होणार नाही. तर, महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे. निर्भय वातावरणात राहता आले पाहिजे तर राज्यातील 20 हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले. सासवड (ता. पुरंदर) येथील पालखीतळावर पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार (काँग्रेस) तथा विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार बोलत होते. यावेळी प्रचार प्रमुख सुदामराव इंगळे, विजयराव कोलते, भारती शेवाळे, अभिजीत जगताप, पुष्कराज जाधव, उल्हास शेवाळे, अशोक ओव्हळ, बाबुसाहेब माहुरकर, भरत झांबरे, शंकर हरपळे, संदीप मोडक, जगन्नाथ शेवाळे, दिनकर हरपळे, उल्हास शेवाळे, मंजिरी घाडगे, दिलीप बारभाई, संजय हरपळे, गौरी कुंजीर, प्रदीप पोमण, माणिकराव झेंडे पाटील, राजेश सरकटे उपस्थित होते. शरद पवार म्हणाले की, पाच वर्षे मुंबईत रहायचे निवडणूक आली की पुरंदरमध्ये यायचे. यांनी कोणती कामे आत्तापर्यंत पूर्ण केली? त्याचबरोबर तुमच्याच विचाराचे मुख्यमंत्री आहेत मग पुरंदर उपसा सिंचन योजना किंवा गुंजवणी सिंचन योजना पूर्ण का करता आले नाही? असा प्रश्न देखील शरद पवारांनी विरोधकांना उपस्थित केला. करोनाच्या काळामध्ये दोन वर्षे वाया गेली राहिलेल्या वेळेमध्ये जलजीवन योजना घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. त्याचबरोबर पुरंदर उपसा सिंचन योजना राजकारण विरहित चालवण्याचे काम केले. पुरंदरमध्ये उसाचे क्षेत्र वाढत असून भविष्यामध्ये साखर कारखाना नगरला न काढता तो पुरंदरमध्ये काढला जाईल. शरद कृषी भवन, तलाठी कार्यालय काही गावांमध्ये पूर्ण केली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक्सीलेंट सेंटरच्या माध्यमातून 63 अधिकारी पुरंदरमध्ये झाले. -संजय जगताप, आमदार