Pune District : राजगुरूनगरवासीयांना दिलासा मिळणार का?

राजगुरूनगर : राजगुरूनगर नगरपरिषदेने केलेली करवाढ तात्काळ रद्द करावी. या मागणीसाठी सोमवारी (दि. 10) पासून सामाजिक कार्यकर्ते अॅड. दीपक थिगळे यांनी सुरू केले असून त्याचे प्रतिसाद विधानसभा अधिवेशनात उमटले आहे. खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित खात्याकडून अहवाल मागवला असून तात्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात बोलताना म्हणाले, खेड -आळंदी मतदारसंघात तीन नगरपरिषदा आहेत. त्यात राजगुरूनगर नगरपरिषद 2014 मध्ये स्थापन झाली. या तीनही नगरपरिषदांमध्ये पाणी, वीज, सांडपाणी, आरोग्य, कचरा आदी जीवनावश्यक सुविधांचा अभाव आहे. त्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. नवीन सुधारणा नसल्याने अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. तथापी राजगुरूनगर नगरपरिषदेने करवाढ केली आहे.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक भार आला येत आहे पहिल्या सुविधा द्या, मग नियमाप्रमाणे करवाढ करावी. याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. संबंधित विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. उपोषण मागे घेतलीम असे आश्वासन मिळावे अशी मागणी केली. दरम्यान, उपोषणकर्ते अॅड. दीपक थिगळे आणि शहरातील युवकांनी जो पर्यंत करवाढ रद्द होत नाही त्याबाबत लेखी उत्तर दिले जात नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की…
आमदार बाबाजी काळे यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. करवाढ रद्द करण्याबाबत राजगुरूनगर येथे उपोषण सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास प्रशासनाला आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगरविकास 2 या विभागाचे प्रधानसचिव यांच्याकडून तातडीने अहवाल घेण्याच्या सूचना मला दिल्या आहेत. संबंधित विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर उचित कारवाई केली जाईल. जे उपोषणाला बसले आहेत त्यांनी उपोषण सोडावे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर तात्काळ निर्णय घेतला जाईल असे सांगितले.





