Pune District: गुरोळी वन विभागातील पाणवठ्यात सोडले पाणी

वाघापूर : कडक उन्हाळ्या सुरू झाल्याने पुरंदर तालुक्यातील वनविभाग परिसरातील वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वन्य प्राण्यांना पाणी उपलब्ध करण्यासाठी झिरो फाउंडेशन व शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्ट ग्रुपच्या सदस्यांच्या तरुणांनी पुढाकार घेतला असून त्यामध्ये टँकरद्वारे पाणी सोडले जात आहे.
गुरोळी (ता.पुरंदर) येथे कानिफनाथ मंदिर व महादेव मंदिर(कैलास मठ) या ठिकाणी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे खासगी सचिव प्रशांत खेडेकर यांच्या माध्यमातून या देवस्थानांना पर्यटन म्हणून दर्जा प्राप्त करण्यात आला व या पर्यटन विकास आराखड्यांतर्गत प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी वन विभागांतर्गत पाणवठे तयार करण्यात आलेली आहे.
गुरोळी परिसरातील वन विभागाच्या कृत्रिम पाणवठ्यामध्ये तरुणांनी सहा हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टँकरने पाणी सोडून वन्य प्राण्यांची तहान भागवली आहे. सामाजिक कार्यकर्ता जालिंदर खेडेकर त्याच्या वतीने हे पाणी सोडण्यात आले.
संस्थेचे सदस्य प्रदीप खेडेकर व त्यांच्या सहकारी मित्रांनी यासाठी परिश्रम घेतले.यावेळी जालिंदर खेडेकर, प्रदीप खेडेकर, अक्षय खेडेकर,ओम खेडेकर,शंभू खेडेकर, सचिन भंडलकर,संतोष खेडेकर, लक्ष्मण खेडेकर उपस्थित होते





