Pune District : घोडनदी पात्रात पावसामुळे पाण्याची पातळी वाढली
Updated On:

– धोकादायक पद्धतीने नागरिक करतात मच्छीमारी
मंचर – आंबेगाव तालुक्यातील घोडनदी पात्रात पावसामुळे पाण्याची पातळी वाढली असताना त्या ठिकाणी धोकादायक पद्धतीने ठाकर व इतर समाजातील नागरिक मच्छीमारी करताना दिसून येतात.
पाण्याची पातळी वाढल्यानंतर गढूळ पाण्यात मासे मोठ्या प्रमाणावर सापडत असतात.त्यामुळे बहुतांशी नागरिक धोकादायक पद्धतीने मासेमारी करण्यासाठी नदीपात्रात प्रवेश करतात.यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.
सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओढ्या नाल्यातील पाणी गावातील नदीला येऊन मिळत असल्याने नदीपात्राची पाणी पातळी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.





