पुणे जिल्हा : उत्रौली ग्रामदेवता ट्रस्ट निवडणूक बिनविरोध

वीसगाव खोरे – उत्रौली (ता.भोर) येथील ग्रामदैवत सोनार सिद्ध भैरवनाथ मंदिरात झालेल्या सभेत खेळीमेळीच्या वातावरणात पाच वर्षांसाठी गावच्या ग्रामदेवता ट्रस्टच्या नवीन विश्वस्त मंडळाची (कालावधी सन २०२४ ते सन २०२९) बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त विश्वस्त मंडळाचे अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी ग्रामदेवता ट्रस्ट अध्यक्ष भरत शिवतरे, अशोक शिवतरे, भगवान शिवतरे, हनुमंत शिवतरे, राजेंद्र शेटे, संतोष शिवतरे, रामचंद्र शिवतरे, सीताराम शिवतरे, जगन्नाथ शेटे, जयाजी शिंदे, सचिन शिवतरे, अरुण शिवतरे, अशोक शेटे, अनिल येडवे, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
बिनविरोध विश्वस्त मंडळ ग्रामदेवता ट्रस्ट : अतुल शिवतरे,शिवाजी शेटे, सुनील शिंदे, योगेश शिवतरे, अशोक शिवतरे, नवनाथ शेटे, रमेश शेटे, राजेंद्र भोईटे, अरुण शिवतरे, गणेश शेटे, किसन शेटे, ज्ञानेश्वर येडवे, आकाश शिवतरे, अविनाश शिवतरे, श्रीकांत शेटे, सागर शिवतरे, स्वानिल कुंभार, शिवाजी गाढवे, संगिता शेटे, नंदा शिवतरे, बबन जाधव आदींची निवड करण्यात आली.





