वीसगाव खोरे : भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील शेतीच्या पाण्यापासून वंचित असलेल्या ७ गावातील उपसा जलसिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन आमदार शंकर मांडेकर यांनी केले. वरोडीखुर्द येथील विविध विकास कामांचे उदघाटन आणि ग्रामस्थांच्या वतीने आमदार शंकर मांडेकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी मांडेकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष घोरपडे, उद्योजक विलास वरे, अरुण वरे, नितीन थोपटे, यशवंत डाळ, रघुनाथ भोसले, अतुल शिवतरे, अविनाश गायकवाड, तानाजी चंदनशिव, सुरेश कडु, सुरेश बदक, सुहीत जाधव, बाळासो खुटवड, सुभाष वरे, गोरख चौधरी, बापू मांढरे,ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सतिष वरे, भरत तुपे,किरण सावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विलास वरे म्हणाले, गावातील पाणंद रस्ता आणी बहुउददेशिय हाॅलचे काम करावे. वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला असून शेतीचे नुकसान होत आहे. त्यावर उपाययोजना कराव्यात व एस.टी सेवा चांगल्या प्रकारे व्हावी. यावेळी रणजीत शिवतरे म्हणाले, वीसगावमधील वरोडी खुर्द, वरोडी बु., वरोडी डायमुख, पाले, आंबाडे, बालवडी व नेरे या ७ गावांना शेतीच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांना पाणी मिळण्यासाठी सतत पाठपुरावा केला, त्याला यश आले असून लवकरच मंजुरी मिळेल. आमदार शंकर मांडेकर म्हणाले, वीसगाव काँग्रेसचा बालेकिल्ला होता.माञ आत्ता राहिलेला नाही.मी एकटा आमदार नसून तीनही तालुक्यातील सर्वजण आमदार आहेत. एस.टी,पिण्याचे पाणी रस्ते याबाबत अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन मार्गी लावणार आहे. सात गावातील उपसायोजनेचे काम लवकरच मार्गी लावू विधानसभेत बदल झालाय. आता तालुक्यातही बदल होईल. राजेंद्र भोसले,मनोज खोपडे यांनी सूत्रसंचालन केले.