Pune District : कळंब येथे बायपास रस्त्यावर आढळला अनोळखी मृतदेह
Updated On:

मंचर : मौजे कळंब (ता.आंबेगाव) येथील बायपास रस्त्यावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. ओळख पटवण्यासाठी मंचर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी केले.
कळंब येथील बायपास रस्त्यावर पुणे-नाशिक हम रस्त्यावर एक निळा शर्ट व काळी पॅन्ट घातलेले अनोळखी मृतदेह मिळून आली आहे. सदर मयताची ओळख पटलेली नाही.
तरी सदर मृतदेह कोणाचा असेल त्यांनी मंचर पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ व सुमित मोरे यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन मंचर पोलिसांनी केले.





