पुणे जिल्हा : आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तिघांना अटक

शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक येथे सावत्र भाऊ व मेव्हण्याने केलेल्या मारहाणीच्या नैराश्यातून एकानेे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल करून अटक केली आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
रानु ऊर्फ ठूण्या भरदार काळे (वय 40) असे आत्महत्या केलेल्याच तर अमोल निकलाल काळे, अभिशान प्रकाश काळे, राहुल प्रकाश काळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शशिकला रानु काळे (वय 40) यांनी फिर्याद दिली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहे. जातेगाव बुद्रुक येथील मोरे वस्ती येथे राहणार्या रानु काळे याने त्याचा सावत्र भाऊ अमोल काळे व मेव्हणा अभिशान काळे यांना 800 रुपये उसने दिलेले होते
त्यामुळे रानु याने त्यांच्याकडे उसने दिलेले पैसे मागितले असता अमोलसह अन्य दोघांनी रानुला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली होती तर तिघांनी केलेल्या मारहाणीमुळे रानु याने विषारी औषध प्राशन केले होते. दरम्यान, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असताना उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.





