Pune District: पालाखी मार्गाची कामे लवकरच पूर्ण होणार

वाल्हे : पुरंदर तालुक्यातील वाल्हे जवळील सुकलवाडी फाट्याशेजारी प्रांगणामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येत्या 25 जून रोजी विसावणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा मुक्कामाची पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी, आळंदी देवस्थानचे विश्वस्त, पदाधिकारीवर्ग, पुरंदर प्रशासनाकडून पालखीतळाची पहाणी करण्यात आली.
यावेळी आढळलेल्या त्रुटींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी, पालखी मार्गातील बहुतांश कामे लवकरच पर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
याप्रसंगी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभाग पोलीस अधिकारी तानाजी बरडे,पुरंदरच्या गटविकास अधिकारी शेळके, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग स्वाती दहिवाल,जेजुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे, मंडल अधिकारी भारतकुमार भिसे, तलाठी शरद लोंढे, वाल्हे उपसरपंच साम्राज्ञी लंबाते, वागदरवाडी सरपंच सुनील पवार, सुकलवाडी सरपंच संदेश पवार, उद्योजक राहुल यादव, ग्रामपंचायत सदस्य सागर भुजबळ, तेजस दुर्गाडे, मयुरी भुजबळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांकडे विविध समस्या निवेदनाद्वारे मांडल्या. जिल्हाधिकारी डुडी यांनी यावेळी संबंधितांना त्या त्या कामाच्या सूचना केल्या आहेत.
ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे या मागण्या केल्या
भव्य-दिव्य पालखी तळासाठी असलेल्या दोन स्वागत कमानी पैकी एक स्वागत कमान भुयारीमार्गामुळे वापरात येत नसल्याने नवीन स्वागत कमान उभारण्यात यावी.
पालखी तळासाठी भरीव निधीची तरतूद करून पालखीतळाचे सुशोभीकरण करण्यात यावे.
पर्यायी पालखी महामार्गाचे सद्यःस्थितीत सुरू असलेले काम लवकर पूर्ण करण्यात यावे.
गावातील अतिक्रमणे हटविवित रस्ता रुंदीकरण करण्यात यावे.
रेल्वेचा भुयारीमार्गा धोकादायक झाला संरक्षण भिंती पालखी सोहळ्याच्या आगोदर बांधावी.
पालखी तळावर कायमस्वरूपी रखवालदार हवा
जेजुरी – सासवड ते नीरा राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक असलेली तसेच अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्यात यावीत तसेच जेजुरीच्या पालखी तळावर इमारत बांधकामांचा राडारोडा टाकण्यात येतो , त्यामुळे तळाची दुरावस्था होते या तळांची देखभाल करण्यासाठी कायमस्वरूपी रखवालदार नियुक्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ रत्नपारखी यांचेसह पत्रकारांनी यावेळी केली .





