Pune District : पादीरवाडीत रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार

आळेफाटा : पादीरवाडी (ता.जुन्नर) येथील श्री कानिफनाथ यात्रौत्सवाच्या निमित्ताने हरिनाम सप्ताह व शेवटच्या दोन दिवस बैलगाड्यांच्या शर्यती पार पडल्या. या स्पर्धेत 385 बैलगाडे धावले.
या अखंड हरिनाम सप्ताहात दैनंदिन कार्यक्रमात पहाटे काकडा, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी नेमाचे भजन, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ व रात्री कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम झाले.
हरिनाम महाराष्ट्रातील सप्ताहाच्या काळात नामवंत कीर्तनकारांची सेवा पार पडली. तसेच या ठिकाणी तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नातून नविन बैलगाडा घाट बांधण्यात आला, त्याचे उद्घाटन माजी आमदार बेनके यांच्या हस्ते व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी त्यात ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच रेलीका अरुण जाधव, उपसरपंच गणेश भुजबळ, माजी उप सरपंच ऋषी गडगे, सदस्य संदीप गडगे , सोमनाथ गडगे, आदी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी कानिफनाथ देवस्थानचे सर्व पदाधिकारी यामध्ये देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गोरक्ष पादीर, उपाध्यक्ष वैभव पादीर, सचीव मंगेश पादीर व समस्त ग्रामस्थ पादिरवाडी ग्रामस्थांनी सहकार्य केले. या यात्रेसाठी गावातील सर्व ज्येष्ठ नेते व पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.





