Pune District : सुगरण पक्ष्यांची घरटे बांधण्याची लगबग

वाल्हे –अरे खोप्यामधील खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिला साठी तिने झोका झाडाला टांगला पावसाळा आला की सुगरण पक्षी आपली घरटी बांधन्यात दंग झालेलली असतात. सुगरण पक्षाला विणकर असेही म्हणतात. आपल्या पिलांचे, ऊन-पावसा पासून तसेच अन्य शिकार करणार्या पक्षांकडून आपल्या पिलांचे संरक्षण व्हावे, शत्रू पक्षी व सापांपासून संरक्षण व्हावे म्हणून साधारणतः काटेरी बाभळीच्या वा उंच झाडावर सुगरण घरटे तयार करते. काही लांबोळे तर काही छोटे खोपे फांदीच्या टोकास लटकलेले असतात.
वार्यावर झुलताना आकाशात पाळणा टांगावा, असा भास होतो. बर्याचदा सुगरणींच्या घरट्यांची मोठी वसाहत पाहावयास मिळते. अगदी वादळ-पावसात सुगरणीची घरटी अर्थात खोपे फांदीला घट्ट बांधले असल्याने सुरक्षित राहतात. सुगरणीची घरटे बांधण्याची कला अचंबित करते. जणू काही सुगरण म्हणजे पक्षी जगतातील अभियंताच होय.
म्हणून हा पक्षी नेहमी विहिर, ओढे, नाले च्या कठड्या वरील चिंच, लिंब, करंज, वड, काटेरी वेडी भाबळ, खैर या झाडांच्या फांदीच्या शेंड्याला आपली घरटे बनवतो. शक्यतो विनिच्या हंगामात नर पक्षी घरटी बनवतो व तो मादी ला दाखवतो. कदाचीत ते घरटे मादीला आवडले नाही तर तो दुसरे घरटे बनवतो. नर पक्षी हा गडद पिवळ्या रंगाचा डोके काळे असते तर मादी ही फिक्कट पिवळसर रंगाची असते. साधारण ती चार ते पाच अंडी घालत असते.
सुगरणीचे पिल्लू उडण्याची पूर्ण क्षमता झाल्याशिवाय उडत नाही. दिवसेंदिवस वाढणार्या सिमेंटच्या जंगलाबरोबरच वाढत्या वृक्षतोडीने झाडांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळेच सुगरणीच्या खोप्यांची संख्या कमी होत आहे. सुगरण नराला घरटे विणण्यास जागा मिळत नाही. असे असले तरीही, अजूननही ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी अशी घरटे दिसतात.





