Pune District : ऐतिहासिक होळकर वाडा कोसळणार!

जेजुरीत अतिक्रमित बांधकाम न थांबल्यास आंदोलनाचा होळकर ट्रस्टचा इशारा
जेजुरी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी येथील 265 वर्षांपूर्वीचा वाडा आणि वाड्याभोवती नव्याने होत असलेल्या बांधकामामुळे जेजुरी येथील ऐतिहासिक वास्तू होळकर वाडा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गांवर आहे. वाड्याच्या वापरात असलेल्या इमारतीच्या भिंतींना आंतरभागात भेगा पडून व तडे जाऊन वाडा कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गांवर आहे. वेळीच लक्ष न दिल्यास आणि नवीन बांधकाम न थांबविल्यास एक उत्तम बांधकाम शैलीचे होळकर घराण्याची ऐतिहासिक वास्तू नष्ट होईल. याबाबत स्थानिक नगरपलिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनास निवेदन दिले असून संपूर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा खासगी देवी अहिल्याबाई होळकर चॅरिटी ट्रस्टच्या वतीने देण्यात आला आहे.
अहिल्यादेवी होळकर सुभेदार तुकोजी होळकर यांनी सन 1745 ते 1765 दरम्यान कुलदैवत खंडोबा गडाची तटबंदी, बालद्वारी, नगारखाना आदी बांधकामे केली. त्याचबरोबर 1768 दरम्यान स्वराज्याचे पंतप्रधान पेशवे यांचे परवानगीने खोमणे-पाटील यांच्याकडून वाडा बांधकामासाठी जागा घेऊन होळकर वाड्याची निर्मिती केली होती. या वाड्याचा आजतागत लोकसेवा म्हणून उपयोग झाला. पुरातन काळापासून गोरगरीब परिवारातील लग्नकार्ये याच वाड्यात पार पडली आहेत. 1991ते 2010या वाड्यात आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे महाविद्यालय चालवले जात होते त्यानंतर चिंचेच्या बागेत विद्यालय स्थलांतरित झाले आणि वाड्याकडे दुर्लक्ष झाले.
अहिल्यादेवी होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या लोकांभिमुख कार्याची साक्ष देणारी भविक यात्रेकरू ना कुलधर्म कुलाचार करिता वाडा चिंचेची बाग. होळकर तलाव यांची निर्मिती केली याची साक्ष असलेले मल्हार गौतमेश्वर स्मृती छत्री मंदिर अदयापही साक्ष देत उभे आहे महाराजा होळकर ट्रस्टच्या ऐतिहासिक जागांची खरेदी विक्री दृश्य अदृश्य प्रमाणात झाल्यामुळे अनेक जागेवर नवीन वहीवाटी दारानी बांधकामे ही केली आहेत परंतु हा वाडा मात्र काही काळाचा सोबती असून वेळीस लक्ष न दिल्यास एक महत्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याची भीती होळकर इतिहास संशोधक अभ्यासक रामभाऊ लांडे यांनी व्यक्त केली आहे. तमाम देशभरातील धनगर समाज मोठे आंदोलनही करण्या करिता रस्त्यावर उतरेल असे देवी अहिल्या होळकर ट्रस्टने दिलेल्या निवेदनात म्हंटले असून याबाबत वाड्या लगतचे बांधकाम त्वरित थांबविणे या संबंधित निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही देण्यात आले आहे.
…परंतु ते ही निष्फळ ठरले
मध्यंतरीच्या काळात होळकर घराण्याचे वंशजांनी दुर्लक्ष केल्याने वाडा काही काळ बंद होता पुन्हा चांदवड ट्रस्ट अंतर्गत होळकर वाडा ट्रस्टची निर्मिती करून भक्ती निवास म्हणून वापरात आणला गेला; परंतु आर्थिक मिळकत आणि देखभाल व्यस्थापन करणे जिकरीचे होऊ लागल्याने वाडा सांभाळणे कठीण होत असल्याचे जेजुरी होळकर ट्रस्ट अध्यक्ष अंकुश भांड आणि कमिटी ट्रस्ट आणि डागडुजी दुरुस्ती करिता समाजाबांधवांच्या मदतीने प्रयत्न केले परंतु ते ही निष्फळ ठरले.याबाबत होळकर घराण्याचे 16वे वंशज युवराज यशवंतराव होळकर यांनी अनेकदा वाड्याला भेटी दिल्या होत्या.
जेजुरी नगरीतील ऐतिहासिक वाडा अद्याप ही होळकरशाही आणि त्यांच्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे; परंतु कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
– कैलास शिंगणे, व्यवस्थापक
जागा अखेर लुटल्या तरी कुणी?
राजमाता देवी अहिल्याबाई होळकर यांनी जेजुरी परिसरात भविक यात्रेकरू करिता निवास, जलव्यवस्था चिंचबाग निर्मिती सारखे भव्तिव्य दृष्टीकोनातून लोकहिताचे कार्य केले आज मात्र तुळशीपत्र ठेवलेल्या होळकर घराण्यांच्या जागा अखेर लुटल्या तरी कुणी? असा सवाल समाजबांधव करत आहेत.





